अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- काँग्रेस पक्षामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते. ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या सोनिया गांधी यांच्या निमित्ताने महिला आहेत त्या पक्षाकडे महिलांचा ओढा अधिक असणे स्वाभाविक बाब आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
कौसर खान यांच्यासह अनेक महिलांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी काळे बोलत होते. निजामभाई जहागीरदार, सेवादलाचे अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, डॉ.रिजवान अहमद यांच्या विशेष पुढाकारातून प्रवेश सोहळ्याचे आयोजन काँग्रेस कमिटीमध्ये करण्यात आले होते.
यावेळी कौसर खान यांच्यासह शाहीन बागवान, अनुराधा भंडारे, यास्मिन शेख, शबाना शेख, सुरैय्या शेख, रुबीना बागवान, उमा छजलानी, जिलेदा शेख आदींसह अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी त्यांचे यावेळी पक्षात स्वागत केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये महिलांना योग्य ती संधी देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे यावेळी काळे म्हणाले. दीप चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला १३५ वर्षांची परंपरा आहे.
इंदिरा गांधी, सोनिया गांधी या सारख्या सक्षम महिलांनी पक्षाचे नेतृत्व केले आहे. ज्येष्ठ नेते निजामभाई जहागीरदार म्हणाले की, काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या एका महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी देत महिलांचा बहुमान या देशामध्ये केला आहे.
सेवादल अध्यक्ष डॉ. मनोज लोंढे म्हणाले की, सेवादलाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचे काम पक्षाच्यावतीने केले जाईल. डॉ. दिलीप बागल म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक विचारधारेवरती चालणारा महिलांना येथे काम करण्यासाठी मोठी संधी आहे.
दिप चव्हाण यांची राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, प्रा. डॉ. बापूसाहेब चंदनशिवे, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे,
विद्यार्थी काँग्रेसचे प्रशांत जाधव, शरीफ सय्यद, शेख सलीम, सेवादलाच्या वैशालीताई दालवाले, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, निताताई बर्वे, नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सचिन पठारे, रमेश ननावरे, बाळासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com