अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- शेतकऱ्यांनी शेतात जाणे येण्याचे रस्ते, शिव रस्ते, पांदण रस्ते अडवून नयेत. एकमेकांशी चर्चा करून चर्चेने हे प्रश्न सोडवावेत. शेतात जाण्यासाठी रस्तेआवश्यकच आहेत असे प्रतिपादन जि. प.सदस्या हर्षदा काकडे यांनी केले.
सालवडगाव ते जुना माळेगाव रस्त्याचे काम करून तो खुला करून मिळावा असे निवेदन तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले. यावेळी काकडे म्हणाल्या की, प्रत्येक शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता हवा असतो. मात्र सर्वांनी एक विचाराने शिव रस्ते, पांदण रस्ते खुले केले पाहिजेत.

सालवडगाव ते माळेगाव हा जुना पांदन रस्ता आहे. त्या रस्त्यावर गेली ५०-६० वर्षापासून ६० ते ७० कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील वस्तीवरील लोकांना दळण-वळणासाठी एवढाच एक रस्ता आहे.
त्या रस्त्यावर काही ठिकाणी आपसातच वाद असल्याने रस्त्याचे काम होत नाही उन्हाळ्यातच या रस्त्याने जाता येते. इतरवेळी या रस्त्यावर पाणी असते. त्यामुळे सदरच्या पांदन रस्त्याचे काम होऊन सदरचा रस्ता नागरिकांना दळणवळणासाठी शासनाने खुला करावा असेही काकडे म्हणाल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













