मुंबई : रोहित पवार यंदा पहिल्यांदाचा विधानसभेची पायरी चढले. सत्तानाट्य संपल्यानंतर सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेच या रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये काम आणि योजनांची आखणी सुरु केली आहे.
राष्ट्रवादीचा हा युवा चेहरा कामाला असून कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा पवार पॅटर्न सुरु झाला आहे.
यंदा 30 हून अधिक तरुण आमदारांची फौज विधानसभेत पोहोचली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, राम सातपुते, देवेंद्र भुयार, संदीप क्षीरसागर असे असंख्य आमदार नव्या उमेदीचे आहेत.
कर्जत-जामखेडमधला जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न हा प्रामुख्यानं रोहित पवारांनी हाती घेतलाय. मतदारसंघात कामं आणि योजनांचा धडाका सुरु केलंय.
कुकडी प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनींचा मोबदलाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी चा मोबदला 25-30 वर्ष होऊनही सरकार दरबारी अडकून पडला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात 62 लाभार्थींना 6 कोटी 85 लाखांचे धनादेश देण्यात आले आहेत.
याशिवाय कर्जत तालुक्यांतील मंदिरांच्या विकासासाठी अभिनेता मिलिंद गुणाजींच्या माध्यमातून नवी योजनाही राबवली जाणार आहे.