राहुरी :- तीन दिवसांपासून उपाशीपोटी घराकडे निघालेल्या परप्रांतीय वाटसरूंना मदत करण्याऐवजी मारहाण झाल्याच्या घटनेने राहुरी तालुक्याला गालबोट लागले.
मारहाणीची घटना नगर-मनमाड राज्य मार्गावरील गुहा हद्दीत शनिवारी दुपारी घडली. शनिवारी दोन मालवाहू ट्रकमधून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील महिला, पुरुष व छोटी मुले इचलकरंजीहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघाले होते.
गुहा हद्दीत पाणी पिण्यासाठी थांबले होते. दरम्यान, दुसऱ्या गावातील काही लोकांनी घटनास्थळी येऊन या मजुरांची चौकशी करत त्यांना मदत करण्याऐवजी मारहाण केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®