मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात भगवा फडकवणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात शिवसेनेची सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे.

असे प्रतिपादन श्रीरामपूर तालुका शिवसेना प्रमुख दादासाहेब कोकणे यांनी केले आहे. सध्या सर्वत्र ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातही 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नुकतीच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका शिवसेना प्रमुख दादासाहेब कोकणे यांनी दिली.

ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या या निवडणुकांपासून शिवसेना दूर न राहता तालुक्यातील सर्व 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. ग्रामीण भागाच्या व्यापक हितासाठी व विकासासाठी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार आहे, असे कोकणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment