अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- काही अटी व शर्तीवर साई मंदिर (Sai baba mandir)उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असून
संस्थांनच्या आरोग्य सेवेचे नूतनीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यास नवीन विश्वस्त मंडळ प्राधान्य देणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी दिली.
साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळावर निवड झाल्याबद्दल सुरेश वाबळे,सचिन गुजर व अनुराधाताई आदिक तसेच चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अक्षय छाजेड व फ्रुट सेफ्टी बी.टेक परीक्षेत उत्तीर्ण झालेला मोहित लोढाचा राहूरी फॅक्टरी येथे साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
वाबळे म्हणाले साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदावर काम करण्याची दुस-यांदा मिळालेली संधी ही माझ्या श्रद्धेचे फळ आसुन विश्वस्त पदाच्या माध्यमातुन सर्व सामान्यांची सेवा करणार आहे.
शिवाजी कपाळे म्हणाले, अंगी नम्रता व बाबांच्या श्रद्धा व सबुरीचे पालन करणारे भक्त म्हणून सुरेश वाबळेंची ओळख आहे. या निवडीचा पतसंस्था चळवळ व राहूरी तालुक्याला मोठा आनंद झाल्याचे शिवाजीराव कपाळे यांनी म्हटले.
विश्वस्त सचिन गुजर म्हणाले, कुठल्याही संस्थेत काम करताना समाजहिताची जोपासणा महत्वाची आहे. शिर्डीच्या साई दरबारी काम करताना सामान्यांना न्याय कसा देता येईल यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्नशील राहणार आहे.
अनुराधा आदिक यांनी मनोगत व्यक्त केले. या सत्कार कार्यक्रमास श्रीरामपूरच्या माजी नगरसेविका पानसरे, हंसराज आदिक, आबासाहेब वाळुंज, विष्णु गीते, किशोर थोरात,
अविनाश साबरे, बाळासाहेब तांबे, बाबासाहेब वाळुंज, चांगदेव पवळे, पारस नहार, शफी शेख, राजु छाजेड, संतोष लोढा, धीरज कपाळे, अनिल वाघमारे, जयंती छाजेड, मॅनेजर सचिन खडके उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम