अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- सोशल मीडियामधील लोकप्रिय ॲप म्हणून सर्रास वापरले जाणारे व्हाट्स ॲप हे आजकाल प्रत्येक जण वापरू लागला आहे. वाढत्या वापरामुळे, व निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे याला काही बंधने घालण्यात आली आहे.
या सोशल प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जातो. असाच एक मेसेज व्हाट्सॲपच्या ॲडमिनला चांगलाच भोवला आहे.
कोविड काळात साईदीप हॉस्पिटल तसेच इतर खासगी रुग्णालयांची बदनामी करणारा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल करून हॉस्पिटलची बदनामी केल्याप्रकरणी एका व्हाटस ॲप ग्रुप ॲडमिन विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
साईदीप हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सम्राट गल्ली मित्र मंडळ या व्हाटसग्रुपचा ॲडमिन अभिजीत चिपा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved