पालकमंत्र्यांचे साईंच्या चरणी साकडे; म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-अनेक दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे काल नगर दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा नियोजित दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रथम शिर्डी येथील श्री साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी साई चरणी नतमस्तक होत पालकमंत्र्यांनी साईंना साकडे घातले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून जगावर आलेले कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जग या कोरोना विरुद्धच्या युद्धात सामील झाले आहे, या महामारीचा मुकाबला करत आहे. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी जगात ख्याती असलेल्या साईबाबांना साकडे घातले आहे.

जगामध्ये आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे, अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.

हे मी माझे भाग्य समजतो. काही दिवसांपूर्वी येथे आलो होतो. परंतु मंदिर उघडण्यास बंदी असल्याने मला दर्शन घेता आले नाही. असेही ते म्हणाले. साई संस्थानने भक्तांच्या पोषाखाबाबत घेतलेल्या निर्णयावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

या निर्णयाबाबत गैरसमज न करता केवळ पावित्र्य टिकावे, या भावनेतून संस्थांनने हे केलेले आवाहन आहे, असे त्यांनी स्पष्ट करतानाच या आवाहनाचे पालन करावे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment