अन्यायकारक कृषी कायदे रद्द करा समाजवादी पार्टीची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर पारित केलेले तीन अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली, तर भारत बंदला पाठिंबा दिला.

मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

तसेच केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे, मोहंमद हुसेन, शफी सय्यद, नदीम शेख, मुबीन शेख, परवेज खान,

वसीम खान, ओंकार केंद्रे, फईम शेख, दिशान शेख, जावेद शेख आदि उपस्थित होते. केंद्र सरकारने नवीन बहुमताच्या जोरावर पारित केलेले तीन कृषी कायदे हे देशातील शेतकर्‍यांच्या विरोधात आहे.

या कायद्यातील तरतुदींमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत असून,

केंद्र सरकारने त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी केलेला प्रकार निषेधार्ह आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आसीम आजमी यांच्या आदेशान्वये समाजवादी पार्टीने संपुर्ण महाराष्ट्रात या बंद मध्ये उतरली असून,

शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. केंद्र सरकारने पारित केलेले अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe