अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील 50पैकी 45 ठिकाणी ग्रामस्थांनी वाळूच्या लिलावाला विरोध केला होता. तर तालुक्यातील मुळा नदीपात्रात तीन व प्रवरा नदीपात्रात दोन अशा ५ ठिकाणच्या वाळूसाठ्यांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता.
नुकत्याच झालेल्या लोक सुनावणीनंतर पाच ठिकाणच्या वाळूसाठ्याच्या लिलावांवर शिक्कामोर्तब झाले. या अनुषंगाने त्या पाच ठिकाणी महसूल खात्याने लिलावाची प्रक्रिया सुरू केली. जिल्हा प्रशासनाला तालुक्यातील पाच ठिकाणी लिलावासाठी 19 हजार 334 ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.
त्यातून महसूल विभागाला सात कोटी 20 लाख 73 हजार रुपये स्वामित्वधन (रॉयल्टी) मिळणे अपेक्षित आहे. आगामी जानेवारीत वाळूचे लिलाव होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला, तरी तालुक्यातील महसूलची वसुली शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वाळूलिलावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाळूचे प्रस्तावित लिलाव गाव नदी ब्रास रॉयल्टी
- राहुरी खुर्द मुळा 1272 47 लाख 40 हजार
- पिंपरी वळण/चंडकापूर मुळा 1074 40 लाख 20 हजार
- वळण मुळा 8110 3 कोटी 2 लाख 25 हजार
- रामपूर प्रवरा 3578 1 कोटी 33 लाख 35 हजार
- सात्रळ प्रवरा 5300 1 कोटी 97 लाख 53 हजार.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved