वाळूतस्करांची मुजोरी ; ‘येथे’ तलाठ्याला धक्काबुक्की

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- विनापरवाना वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेले संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे कामगार तलाठी संग्राम देशमुख यांना तस्करांनी आरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली.

या प्रकरणी संग्राम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी आश्वी पोलीस स्टेशनला सरकारी पंच होण्यासाठी ते स्वतः व कामगार तलाठी सुमित जाधव दुचाकीवरून आश्वी पोलीस स्टेशनला जात होते.

प्रवरा नदीपात्रात अवैध रित्या वाळू वाहतूक सुरू आहे का हे पाहण्यासाठी ते नदीपात्रात गेले. त्या ठिकाणी विजय गोरख माळी, राजेंद्र बकाजी नागरे,

अनिल राजेंद्र नागरे (सर्व रा. प्रतापपूर) यांनी आम्ही याच गावचे असून आमचे कोणी काहीच वाकडे करु शकत नाही असे म्हणत तलाठ्यास धक्का बुक्की करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 211/2020 भारतीय दंड संहिता 363,376 नुसार दाखल झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment