अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- देशभरात अशा अनेक कंपन्या अस्तित्वात आहे. मार्केटींग क्षेत्रात काम करणार्या या कंपन्या विविध वस्तू विक्रीच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाल्याचेही अनेक उदाहरणे आहेत.
तरीही लोक या अमिषाला बळी पडतातच. अशीच एक फसवणुकीची घटना संगमनेर मध्ये घडली आहे. हरियानातील एका कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींच्या अमिशाला बळी पडत तालुक्यातील अनेक नागरिकांनी या कंपनीत कोट्यवधीची केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे.
तालुक्यातील ‘गणीभाई’ या कंपनीच्या प्रतिनिधीने अनेक नागरिकांकडून कंपनीच्या नावाखाली कोट्यवधीची रक्कम जमा केली आहे. विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन, घराघरात रोजगार असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून 2015 साली हिस्सार येथे स्थापन झालेल्या या कंपनीने भारताबरोबरच नेपाळ, हॉगकाँग, भुतान व श्रीलंकेत पाय पसरले.
दीड कोटीपेक्षा अधिक लोक आमच्याकडे काम करत असल्याचा दावा कंपनीचे प्रतिनिधी करतात. चैन पद्धतीने हि कंपनी काम करते. याशिवाय 2 लाख 21 हजार रुपये गुंतवणूक केल्यास कंपनीचे कोर कमिटी मेंबर म्हणून संधी दिली जाईल. यातून कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी 5 टक्के रक्कम दर महिन्याला दिली जाईल.
याशिवाय 6 हजार 912 रुपये अजन्म दिले जातील असे अमिश कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींकडून देण्यात येते. दरम्यान 2018 पासून ही कंपनी बंद आहे. कंपनीचे कामकाज पूर्ण बंद असतानाही या कंपनीच्या नावाखाली काही प्रतिनिधींनी नागरिकांकडून पैसे लुटले.
तालुक्यातील एका खेडे गावातील युवक या कंपनीचे काम करतो. नागरीकांना फसविल्याने त्याला ‘गणीभाई’ असे टोपन नाव पडले आहे.
सदर कंपनीच बंद पडल्याने या कंपनीत गुंतवणूक करणार्यांच्या अवस्था अतिशय वाईट झाली आहे. संतापलेले हे गुंतवणूकदार लवकरच पोलीस ठाण्यात या कंपनीच्या व कंपनीत काम करणार्या गणीभाईच्या विरोधात दाद मागणार असल्याचे काही गुंतवणूकदारांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved