संग्राम जगताप यांचे ‘हे’ आहे अहिल्यानगरच्या विकासाचे व्हिजन 2029! वाचा सध्या प्रगतीपथावरील कामे आणि येणाऱ्या काळात केली जाणारी कामे

अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी काल सहकार सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला व यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी शहरांमध्ये केलेली कामे म्हणजेच शहराचा भूतकाळ आणि बदलते भविष्य हे नागरिकांसमोर मांडले.

Ajay Patil
Published:
sangram jagtap

Ahilyanagar News:- अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी काल सहकार सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला व यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी शहरांमध्ये केलेली कामे म्हणजेच शहराचा भूतकाळ आणि बदलते भविष्य हे नागरिकांसमोर मांडले.

ही विधानसभेची निवडणूक अहिल्यानगर शहराचे भविष्य ठरवणारी असून नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही व येत्या पाच वर्षात नगर शहराला मेट्रोसिटी बनवण्यासाठी व्हिजन 2029 अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच ही कामे काल्पनिक नसून ती ऑन रेकॉर्ड आहेत अशी ग्वाही देखील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिली.

यावेळी त्यांनी म्हटले की, नगर शहराच्या विकासाकरिता शासनाकडे पाठपुरावा केला व त्यामुळे विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे.

या उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. ही कामे कागदोपत्री सुरू आहेत असे जर वाटत असेल तर माहितीच्या अधिकारात माहिती तुम्ही मागवू शकतात. कारण हे काल्पनिक व्हिजन नाही असे देखील त्यांनी म्हटले.

अहिल्या नगरच्या विकासाचे व्हिजन 2029 कसे आहे?

1- पाणीपुरवठ्यासाठी फेज तीन पाणी योजनेकरिता 850 कोटींचा प्रस्ताव

2- गंज बाजार येथील भाजी मार्केटची अद्ययावत इमारत

3- महानगरपालिकाच्या शाळा डिजिटल व वातानुकूलित करणार

4- आबालवृद्धांकरिता निसर्ग संपन्न अशा उद्यानाचा विकास केला जाईल.

5- महिलांकरिता नामांकित गृह उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाईल.

6- प्रदूषण मुक्त अशा ई बस सेवा सुरू करणार

7- सीना नदी परिसरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली जाणार

8- बुरुडगाव व मुकुंद नगर भागामध्ये ज्येष्ठ नागरिक भवन उभारणार

9- पिंपळगाव माळवी येथे 650 एकर जागेमध्ये थीम पार्क उभारणार

10- विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची उभारणी करणार.

11- एमआयडीसी मधील सन फार्मा चौक आणि सह्याद्री चौकात दुपदरी उड्डाणपूल उभारणार.

12- महत्त्वाचे म्हणजे एमआयडीसीचा विस्तार करून त्या ठिकाणी मोठे उद्योग आणणार.

सध्या ही कामे आहेत प्रगतीपथावर
प्रमुख डीपी रस्त्यांचे मजबुतीकरण अंतिम टप्प्यात असून विविध बेचाळीस भागांमधील रस्त्यांची 400 कोटींची कामे सध्या सुरू आहेत. मुळा धरण ते विळद घाट, वसंत टेकडी दरम्यान पाईपलाईन, पंपिंग स्टेशन आणि साठवण टाक्यांकरिता 137 कोटींचा निधी, शहर कचराकुंडी मुक्त करण्याकरिता घंटागाड्या उपक्रम सुरू,

मलनिसारण व्यवस्था करिता नवीन भुयारी गटारी योजना, बुरुडगाव येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू, सावेडीत सुरू केलेले आद्ययावत हॉस्पिटलचे काम प्रगती पथावर, चौकांचे सुशोभीकरण व महापुरुषांची स्मारके उभारायला सुरुवात,

वाडिया पार्क विकासाकरिता 15 कोटींचा निधी, केडगाव येथे नवीन स्पोर्ट कॉम्प्लेक्स ची निर्मिती करणार, जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन व सावेडीत नाट्यगृहाची निर्मिती करण्याचे काम प्रगती पथावर असून त्यासोबत माळीवाडा, बसस्थानक क्रमांक 3( पुणे),तारकपूर बसस्थानकांच्या नूतनीकरणाचे काम सुरू

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe