अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-जगभरातून साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिर्डीमध्ये स्वछता मोहीम राबवणीयात आली आहे. शिर्डी नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ सव्र्हेक्षण व माझी वसुंधरा अभियान गतीमान करण्यात आले आहे.
या अभियानंतर्गत नालासफाई करण्यात आली. केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी या पंचतत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियान सुरू झाले आहे.
शिर्डी शहराचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल नंबर येणेसाठी नगरपंचायतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातभाई मळा येथील नाल्याची सफाई करण्यात आली.
सर्वांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमास शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक दत्तात्रय कोते,
रविंद्र गोंदकर, ग्रिन ॲन्ड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, जितेंद्र शेळके, ॲड.अनिल शेजवळ, डॉ. धनंजय जगताप यांचेसह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व शिर्डी नगरपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved