अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- तब्बल दहा महिन्यांनंतर राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयातील घंटा खणखणली.कोरोना लाॅकडाऊन काळात विद्यार्थी नसल्याने शाळेला ओसाडपण आले होते.
एक एकर क्षेत्र असलेल्या मैदानावर गवताचे रान माजले होते. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक, तसेच मुले व त्यांचे पालक खूष झाले.
सकाळी बरोबर दहा वाजता शाळेच्या शिपाईमामाने घंटा वाजवली आणि परिसरात चैतन्य निर्माण झाले. कोरोनाची भीती मनातून निघून गेली.
पाठीला वह्या-पुस्तकांची बॅग, तोंडाला मास्क, हातात पाण्याची बाटली घेऊन एकेक विद्यार्थी शाळेत येत असलेले पाहून शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या चेहऱ्यावर सुखद भाव उमटला.
मुख्याध्यापिका नीरा मोरे यांनी सर्व शिक्षकांचे कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याचे सांगितले. शालेतील सर्व वर्गखोल्या निर्जंतूक करण्यात आल्या.
प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनर व ऑक्सिमीटर लावून तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले. सर्व निर्देशांचे पालन करून आम्ही शाळा सुरू केली असल्याचे मुख्याध्यापक मोरे म्हणाल्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- व्यवसायासाठी पाहिजे कर्ज ? ‘ही’ बँक देणार 10000 कोटींचे कर्ज
- ‘असे’ ओळखा आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर आहे
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 10 डिसेंबरपासून 2000 रुपये खात्यात जमा होणार !
- आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !