अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा सुरु होण्याचा मुहूर्त पुढे ढकलला आहे.
यातच मंत्री तनपुरेंनी महत्वपूर्ण विधान केले आहे. राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली आहे.
मुलं घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, असंही राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं आहे. ते नगरला पत्रकारांशी बोलत होते.
सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved