अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- महिलांच्या विषयावरून सध्या देशभर संतापाची लाट उसळली आहे. तरीही दरदिवशी महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
कोपरगाव तालुक्यातील गांधीनगर येथील तरुणाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत ५ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही गजानन नगर येथे आपल्या आई वडिलांसोबत राहते.
आरोपी व तिची ओळख आहे. दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी नकुल ठाकरे याने अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश केला.
तसेच तिच्याशी लगट करून मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिने याबाबत प्रतिकार केला असता तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत तिचे काका घरी असता घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आज दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved