रस्त्याची दुर्दशा पाहून मंत्र्यांचा रागाचा पारा चढला… पहा पुढे काय झाले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. यातच मंत्री महोदय रस्त्याची दुर्दशा पाहून चांगलेच संतापले व त्यांचा रागाचा पारा चांगलाच चढला.

हि गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर रागावलेल्या मंत्र्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोनवरच झापले. हे मंत्रीही दुसरे कोणी नसून मंत्री प्राजक्त तनपुरे हे होते.

नगर- वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा पाहून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच संतापले. विकास कामासाठी पैसे आणण्यास येथे आम्हाला नाकीनऊ येतात आणि त्याचा अशा पद्धतीने दुर उपयोग होणार असेल तर ते मला चालणार नाही.

त्यामुळे तातडीने येथील इंजिनियरला निलंबित करा तडाकाफडकी आदेशच मंत्री तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. यावेळी खड्डे बुजवण्याच्या कामात डांबर, खडी योग्य प्रमाणात नसल्याचे तनपुरे यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे तनपुरे चांगलेच संतापले, व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथूनच फोन लावला. खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करावे आणि संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश तनपुरे यांनी दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment