रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आत्मक्लेष आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते गणेशनगर हा १५ किमी अंतराचा रस्ता अतिशय खराब झाला आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दत्तनगर येथील अशोक लोंढे यांनी अनेक आंदोलने केली, मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याने त्यांनी आत्मक्लेष आंदोलन केले.

अशोक लोंढे व दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी व हुतात्मा दिनानिमित्त वाकडी फाटा येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी आंदोलनस्थळी येऊन जिल्हा परिषद व एमआयडीसी प्राधिकरण एकत्रितपणे तालुक्यातील यशवंत बाबा चौकीपर्यंत खड्डे बुजवील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सचिन बनसोडे, भिमशक्तीचे अध्यक्ष संदीप मगर, शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, कामगार नेते नागेश सावंत, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सुनिल जगताप,

उमेश शेजवल आदींसह अनेक जण उपस्थित होते. राजमहंमद, मेहबूब कल्याण, केतन लांडे, सुखदेव ढोकचौळे, सुरेश शिवलकर आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe