मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठवा! माझी द्रोपदीची झोळी आहे, मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मोनिका राजळेंना विधानसभेत पाठवा. मी राष्ट्रीय महामार्ग व तुमच्या मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सोबत आहे.  माझी द्रौपदीची झोळी आहे. तुमच्या मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Ajay Patil
Published:
nitin gadkari

ही विधानसभा निवडणुक महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे. विकासाचे शिलेदार बनविण्यासाठी तुम्ही  मोनिका राजळेंना विधानसभेत पाठवा. मी राष्ट्रीय महामार्ग व तुमच्या मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सोबत आहे.  माझी द्रौपदीची झोळी आहे. तुमच्या मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शेवगाव येथील खंडोबा माळ येथे महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार महेश कासवाल, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भिमराव फुंदे, बापूसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट, आशुतोष डहाळे, बाबा राजगुरु, उमेश भालासिंग, भगवान बांगर, डॉ. निलेश  मंत्री, कमलेश गांधी, अशोक आहुजा, शोभा अकोलकर, आशाताई गरड, रणजीत बेळगे,अशोक चोरमले गंगा खेडकर,

आदीसह महायुती घटक पक्षांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना गडकरी म्हणाले, राज्याच्या भविष्या करता विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. विकासापेक्षा इतर गोष्टीवर चर्चा केली जाते. लोकसभा निवडणुकीवेळ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात भाजपा संविधान बदलतील असा अपप्रचार केला.

केशवानंद भारती केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही असा निर्णय दिलेला आहे.संविधान कोणाला बदलण्याचा अधिकार नाही. संसदेला देखील नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संविधानात तोडमोड करून खऱ्या अर्थाने संविधानाच्या धज्जा कोणी उडवल्या असतील तर त्या काँग्रेस पक्षाने उडवल्या आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक आपल्या बहिणींना महिन्याला अनुदान देतोय, योजनेच्या खाली अर्जावर कुठं लिहिल आहे का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करता कामा नये. असे सांगत जे कामावर निवडून येऊ शकतं नाहीत, ते जात पुढे करतात. जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असते तेव्हा जातीच हाँटेल पाहतो का. रुचकर जेवण मिळते तिथे जाता.

जेव्हा हार्ट ऑपरेशन करायचं असतं तेव्हा जात पाहात नाही. मग कोणताही चांगला डॉक्टर चालतो. मग निवडणुकीत जात का पाहता. आमदार मोनिका राजळे या माझे मित्र अशोक पाटील डोणगावकर यांच्या कन्या आहेत. त्यांना विकासाची चांगली समज आहे. उच्च शिक्षीत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदार संघात चांगले काम करुन लोकप्रियता मिळवली आहे. मोनिका राजळेंना विजयी करा असे आवाहन गडकरी यांनी केले.

राजीव सुरवसे यांनी सुत्रसंचालन तर बापुसाहेब पाटेकर यांनी आभार मानले.यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजना, या मतदारसंघांमध्ये प्रभावीपणे राबवली. अनेक साखळी बंधारे झाले.

शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं. शेवगाव शहराची पाणीपुरवठा योजना खूप वर्षापासून प्रलंबित होती. जे आज आमच्यावर आरोप करताय की दहा वर्षे आमदारांनी या शहरासाठी काय केलं. माझा त्यांना प्रश्न आहे की, गेल्या २५ ते ३० वर्ष तुमच्या हाती सत्ता होती. मात्र तुम्ही शेवगाव शहराचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवू शकले नाही.

परंतु आमच्या सरकारच्या काळात २०१९ ला शेवगाव शहराची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि एक महिन्यापासून त्याच काम या ठिकाणी सुरु झाले आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून कारखान्याला १५० कोटी कर्ज मिळाले, की पलटी मारल्याचा टोला माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना आमदार मोनिका राजळे यांनी लगावला .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe