अहमदनगर जिल्ह्यात सात एकर ऊस जळून खाक ! उसाच्या शेतामधून जेसीबीने खोदाई…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथे दुपारी दहाच्या सुमारास विजेच्या ताराच्या शॉर्टसर्किटने आग लागून गळीतासाठी आलेला सात एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. शेतातील पिकांवरून गेलेल्या मेनलाईनच्या तारा तुटून उसाच्या शेतात पडल्यामुळे उसाच्या क्षेत्राला मोठी आग लागली.

दरम्यान, उसाच्या शेतामधून जेसीबीने खोदाई केल्यामुळे सुमारे २२ ते २४ एकर ऊस वाचण्यात शेतकऱ्यांना यश आले. तब्बल दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे उपसरपंच सूर्यकांत पाऊलबुद्धे यांनी सांगितले.

मंगळवार (ता. ३) रोजी सकाळी १०च्या दरम्यान घेवरी शिवारातील विनय नाथा पाऊलबुद्धे व गितानात नाथा पाऊलबुद्धे यांच्या १५ एकर आडसाली उसाच्या शेतात आगीचे उसळलेल्या ज्वाला शेतकऱ्यांनी पाहिल्या.

शेजारील शेतकरी जमा होऊन त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु वाऱ्याच्या वेगाने आग नियंत्रणात आणणे शक्य नव्हते. जोरदार वाऱ्यामुळे आगीने आणखी वेगाने पेट घेत उसाला वेडा घातला होता.

परंतु शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत विनय व गितानात यांच्या शेतातील १५ एकर उसाच्या शेताच्या मधोमध जेसीबीच्या साह्याने खोदाई करून शेताचे दोन भाग केल्यामुळे विनय व गितानात याचा ८ एकर व

शेजारील सूर्यकांत पाऊलबुद्धे यांचा ८ एकर ऊस व बाजूचे दुसऱ्या शेजाऱ्यांच्या ६ एकर ऊस असा २२ एकर ऊस वाचवण्यात शेतकऱ्यांना यश आले. आगीत अंदाजे ४०० टन उसाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेचा कामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

शेतातून गेलेल्या विद्युत तारा कमकुवत झलेल्या असताना महावितरण कंपनी त्या बदलत नाही. एखादी जीवितहानीची घटना झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम करणार का?.. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच उसाला आग लागली आहे.

यापुढे तरी कंपनीने काळजी घ्यावी, महावितरणच्या विद्युत तारा कमकुवत झाल्या असून, गेली अनेक वर्षापासून त्या बदलल्या नसल्याने नेहमी तारा तुटण्याच्या घटना रांजणी, भावीनिमगाव, घेवरी, येथे नित्याचेच झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe