अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आहे.
२०२४ च्या निवडणुकीत पवार या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावे, अशी अपेक्षा अामदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आमदार काळे यांच्या पुढाकारातून कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार काळे म्हणाले, शरद पवार हे विचारांचा अथांग महासागर आहे.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते झटत असतात. त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा देऊन उत्साह वाढवीत असतात. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले. कारभारी आगवण, काका कोयटे, कलविंदरसिंग दडीयाल, तुषार पोटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, काका कोयटे, कारभारी आगवन, माधवराव खिलारी, सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, चारुदत्त सिनगर, नवाज कुरेशी, कलविंदर डडियाल, तुषार पोटे, सुनील साळुंके, मंगेश पाटील, असलम शेख, भरत मोरे, स्वप्नजा वाबळे, प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे,
विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, फकीरमामू कुरेशी, कृष्णा आढाव, सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, अनिल कदम, धरम बागरेचा, काळे कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com