Ahmednagar News : राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोस्तवामध्ये लाखो भाविकांनी देवी दर्शन घेऊन सुमारे १ कोटी ६५ लाखांचे दान देवीचरणी अर्पण केले आहे.
यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी १ लाख २ हजार रुपये, सोने २६७ ग्रॅम किंमत १६ लाख ३१ हजार, चांदी वस्तू ९ किलो १२५ ग्रॅम मूल्यांकन रुपये ६ लाख ८४ हजार ६०० रुपये, पावत्यांव्दारे ३३ लाख ७६ हजार ७६० रुपये,

कावड, पालखी एकत्रित रुपये २ लाख २० हजार ६२५, ऑनलाईन ५ लाख १२ हजार ४०० रुपये, अशा विविध स्वरुपात रुपये १ कोटी ६५ लाखांची लाखांची देणगी देवस्थानास प्राप्त झाली आहे.
देवस्थानच्या दानपेट्यांची मोजदाद नुकतीच अहमदनगर येथील धर्मा उपआयुक्त यांचे प्रतिनिधी उमाकांत फड, देवस्थान विश्वस्त, पाथर्डी येथील सराफ शेवाळे, पोलीस व देवस्थान सुरक्षा व सीसीटीव्हीचे निगराणीमध्ये संपन्न झाली.
यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी १ लाख २ हजार तसेच सोने २६७ ग्रॅम मूल्यांकन १६ लाख ३१ हजार चादी वस्तू ९ किलो १२५ ग्रॅम मूल्यांकन ६ लाख ८४ हजार ६०० पावत्यांच्या रु ३३ लाख ७६ हजार ७६० तसेच कावड, पालखी एकत्रित रुपये २ लाख २० हजार ६२५ ऑनलाईन रुपये ५ लाख १२ हजार ४०० अशा विविध स्वरुपात रुपये १ कोटी ६५ लाखांची देणगी देवस्थानास प्राप्त झाली.
शारदीय नवरात्र महोस्तव यशस्वी होण्यासाठी अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक श्रीमती सुवण माने, तहसीलदार श्याम वाडकर,
गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, प्रतिभा दहिफळे विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, श्रीराम परताणी, अँड, कल्याण बड़े, डॉ. श्रीधर देशमुख, अनुराधा केदार, अँड. विक्रम वाडेकर यांनी भाविकांना विशेष सुविचा उपलब्ध करून दिल्या.
देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत संपन्न होण्याकरिता विविध विभागांनी, संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, भाविक भक्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.













