अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – येत्या 5 डिसेंबरपासून शिर्डीसाठी एकाच वेळी दिल्ली, हैदराबाद व बंगळुरूसाठी हवाईसेवा सुरू करण्याची तयारी स्पाईस जेट कंपनीने केली आहे. प्रवासी वाहतुकीसह कार्गो सेवाही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. कोविडच्या छायेतच साईबाबांच्या शिर्डी येथून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
येत्या पाच डिसेंबरपासून स्पाईसजेट दिल्ली, हैदराबाद व बंगळुरू या तीन महानगरांसाठी सेवा सुरू करणार आहे. आसनक्षमतेच्या निम्मे प्रवासी मिळाले, तरी किमान “ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर सेवा सुरू ठेवण्याचा हिशेब त्यामागे आहे.
साईमंदिर खुले झाले, तसे दाक्षिणात्य भाविकांकडून विमान कंपन्यांकडे विचारणा सुरू झाली. कोविडचा प्रकोप सुरू असला, तरी किमान निम्म्या आसन क्षमतेएवढे प्रवासी मिळतील, असे विमान कंपन्यांनी गृहित धरले. त्यानुसार येत्या पाच डिसेंबरपासून नियमित सेवा सुरू करण्याचे जाहीर केले.
तोपर्यंत इंडिगो कंपनीने दिल्लीसाठी दिवसाआड सेवा सुरू केली. दरम्यान प्रवाशांसाठी विमानतळावर अँटीजेन चाचणीची सुविधा सरकारी यंत्रणेने उपलब्ध करून दिली आहे.
स्पाईस जेट 90 आसनी विमानसेवा सुरू करणार आहे. साईमंदिरातील दर्शनव्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत झाली. दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करून दाक्षिणात्य व दिल्लीतील भाविक विमानाने शिर्डीत येत आहेत. कोविड नियंत्रणात आणि दर्शनव्यवस्था अशीच सुरळीत राहिल्यास विमानसेवादेखील सुरू राहील.