आधी प्रेमविवाह नंतर भांडणे ! नवऱ्याने मित्रांच्या सोबतीने केले बायकोला किडनॅप.. अखेर शिर्डीतून सुटका, धक्कादायक थरार..

Published on -

Shirdi News : प्रेम होणं किंवा प्रेमविवाह करणं हे आता समाजाचा एक भाग बनले आहे. आता प्रेमविवाह किंवा प्रेम या गोष्टींकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जाते. बऱ्याचदा ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. परंतु हे प्रेमविवाह सर्वांचेच शेवटपर्यंत टिकतात असे नाही.

अनेक प्रेमवीरांचे संसार अर्ध्यात संपलेले आहेत. दरम्यान आता एक प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचा वेगळाच थरार समोर आलाय. हे जोडपं सिन्नर तालुक्यातल आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर पत्नी माहेरी आली आणि त्यानंतर तिचे मित्रांच्या मदतीने नवनरानेच किडनॅपिंग केल्याचे वास्तव समोर आले आहे.

या लव्हमॅरेज केलेल्या नवरा बायकोत भांडणे झाले होते. ती रागाच्या भरात माहेरी आली. ती आपल्या आईसोबत रस्त्याने कुठेतरी चाललेली होती. हि वेळ साधत तिच्या नवऱ्याने एका कारमध्ये तेथे एंट्री घेतली.

त्यानंतर बळजबरीने तिला कारमध्ये बसवत तिला पळवून नेले. धक्कादायक म्हणजे या अपहरण नाट्यात त्या महिलेच्या नवऱ्याच्या मित्रांनीही मदत केली. ज्या महिलेचे किडनॅपिंग केले गेले ती १९ वर्षांची आहे.

तिला ज्यावेळी कारमधून तिचे अपहरण झाले तेव्हा तिची आई अर्थात पतीचीही सासू तेथे तिच्यासोबाबत होती. तिने त्याला खूप थांबवलं, विरोधही केला परंतु सदर महिलेचा नवरा प्रचंड रागात होता त्याने आईलाही अर्थात सासूलाही यावेळी मारहाण केली.

१९ मार्च रोजी दुपारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला. या अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली.

त्यानंतर अपहरण झालेल्या महिलेची शिर्डी बसस्थानक परिसरातून सुटका केली. तसेच या महिलेच्या पतीला अटक केली. सध्या पतीवर सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपहरणात मदत करणाऱ्या आरोपी पतीच्या मित्रांचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र सध्या आरोपी पतीचे सर्व साथीदार फरार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe