अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शिर्डीमध्ये लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा वाद आणखी चिघळला आहे. संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती.
शिर्डी संस्थाननं लावलेले बोर्ड हटवण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना शिर्डीत प्रवेशबंदी केलीय.
‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?’ असा सवाल करत त्यांनी शिर्डी संस्थानने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन जो बोर्ड लावला आहे, तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साई संस्थानच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं. तर, शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला होता.
त्यामुळेच संभाव्य वादाची परिस्थिती बघता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर बंदी घालण्यात आली आहे.
विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे शिर्डी विभाग यांनी संबंधित आदेश दिले असून शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना आदेशाची नोटीस देखील दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved