अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- शहरात अमृत योजनेंतर्गत विविध रस्त्यांची खोदाई करून ठेवली आहे. ठेकेदाराने खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करून देण्याची अट करारनाम्यात आहे.
ठेकेदार मात्र रस्त्यावरील माती बाजुला सारून चालढकलपणा करत आहे. अमृत योजनेंतर्गत जी कामे सुरू आहेत तीही दर्जेदार नाहीत. निकृष्ट प्रतीचे मटेरियल वापरले जात आहे. त्यामुळे रस्त्यांचे जीवनमान कमी होणार आहे.
दरम्यान या प्रश्नाबाबत शिवराष्ट्र सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातंर्गत खोदलेले रस्ते पूर्वीसारखेच करा या मागणीसाठी शिवराष्ट्र सेनेने आज मंगळवारी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष भैय्या कांबळे, ओबीसी अध्यक्ष बाबासाहेब करपे, दलीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, युवा शहराध्यक्ष शंभुराजे नवसुपे,
भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब जाधव, राधाकिसन कुलट, नितीन थोरात, समीर खडके यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.
शिवराष्ट्र सेनेने कलेक्टर ऑफिससमोर, आयुर्वेद कॉर्नर आणि जुने आरटीओ ऑफिससमोरील रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा महापालिकेला दिला होता.
यातील आयुर्वेद कॉर्नर आणि आरटीओ ऑफिससमोरील रस्ता हा नॅशनल हायवे असल्याने तो आपल्या अखत्यारीत नाही आणि कलेक्टर ऑफिससमोरील रोडचे काम सुरू असल्याचे उत्तर महापालिकेने दिले.
मात्र शहरांतर्गत रस्त्यांचे काय? यावर काहीच कळविले नाही. दरम्यान याबाबत आता शिवराष्ट्र सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र प्रशासन हा प्रश्न सोडविणार कि परिस्थिती जैसी थी राहणार हे आगामी काळातच स्पष्ठ होईल.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved