‘नास्तिक पक्षांबरोबर संसार थाटल्याने शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.

मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता भाजपचे आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस या नास्तिक पक्षांबरोबर शिवसेनेने संसार थाटल्याने त्यांना मंदिर व हिंदुत्वाचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र राज्यातील सरकारने बियर बार उघडले असून मंदिरे मात्र बंद ठेवले आहेत, त्यासाठी आज आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरातून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल (सोमवार ) भाजपच्या आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्यावतीने शिर्डी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी भोसले बोलत होते. याप्रसंगी सुधीर महाराज, बबन मुठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक शिवाजी गोंदकर आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले की,राज्यात लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले आहे,

राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे हे स्वतःच आग्रही झाले होते.

‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून शिर्डी येथील साईबाबा मंदिर सुरू करावे,’ अशी मागणी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली. ‘कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, ही दक्षता घेण्यासाठी सरकारने मंदिर बंद केले होते. मंदिर बंद करण्याचा तसा काही विषय नव्हता.

तेथे केवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत, म्हणून ती बंद केली होती. आता टप्प्याटप्याने मंदिरे सुद्धा सुरू होतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment