अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- शिवसेना हा संघर्ष करणारांचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांचा पक्ष आहे.
कोरोना सारख्या माहामारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून या काळात एक चांगले काम केले, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
कर्जत येथे शिवसंपर्क अभियानप्रसंगी बोलत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, सुनील वाकळे, तालुका प्रमुख बळीराम यादव, जामखेडचे संजय काशीद, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी उपसरपंच अमृत लिंगडे, महिला आघाडीच्या संघटक मंगलाताई म्हस्के,
चंदनबाला बोरा,सुनीता हिरडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गडाख म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक खऱ्या आणि संघर्ष केलेल्या शिवसैनिकाला महाविकास आघाडीत मानाचे स्थान मिळणारच आहे.
त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकानी पक्षाचे कार्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य समाजाच्या प्रत्येक स्तरात पोहचवण्याचे काम करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य पाहता ते प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांना न्याय देत असल्याने त्यांची लोकप्रियता महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रथमस्थानी आहे.
कोरोना महामारीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेने देखील त्यांचे कौतुक केले आहे. आगामी काळात पक्ष वाढीसाठी सर्वानी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडावे असे म्हणत नियुक्त केलेल्या नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, राज्यात शिवसेनाचा मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागात शिवसैनिकानी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कार्य घराघरात पोहचवले पाहिजे. देशात कोरोना सारख्या महामारीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट कार्य केले असून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे
यांना मिळालेले स्थान सर्व शिवसैनिकासाठी कौतुकास्पद आहे. युवकांनी देखील युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य तरुणाईमध्ये पोहचण्याची जबाबदारी पार पाडावी. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हा महिला संघटक सुनीता हिरडे, जामखेडचे शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीद,
माजी उपसरपंच अमृत लिंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिवाजी नवले यांनी केले तर आभार सावता हजारे यांनी मानले. यावेळी पप्पू फाळके, अनिल यादव, रोहित तोरडमल आदि उपस्थित होते. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री गडाख यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे, बापूसाहेब नेटके, महेश जेवरे, रवी पाटील, मनीषा सोनमाळी, डॉ. शबनम इनामदार आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम