पारनेरमधील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ खेळीचा शिवसेनेने काढला ‘असा’ वचपा?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला.

या प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेनेने कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देऊन वचपा काढला.

शिवसेनेने कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी करत राष्ट्रवादीला धोबीपछाड केल्याने या निवडणुकीची समीकरणेच बदलली.

या घटनेमुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीला सभापती आणि उपसभापतीपदावर पाणी सोडावे लागले. कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते. मात्र रविवारी सकाळी अचानक मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांचे अचानक सूर जुळले.

राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली. तर, शिवसेनेचे रमेश बांगर उपसभापतीपद मिळाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment