अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गटबाजीच्या राजकारणात अडकलेली शिवसेना आता पक्षातील अंतर्गत मुद्द्याहून बाहेर पडली आहे. शिवसेनेने नुकतीच शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांचा विषय हाती घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शहरातील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीतील अवैध 28 गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका विकास आघाडीचे नेते व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
आयुक्तांनी आठ दिवसांत या प्रकरणी शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बाजार समितीच्या आवारात सत्ताधाऱ्यांनी अवैधरित्या 28 गाळे बांधल्याचा आरोप नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेतर्फे करण्यात आला.
हे गाळे तातडीने पाडावेत, अशी मागणी करीत नगर तालुका महाविकास आघाडीचे बाळासाहेब हराळ व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे, स्मिता अष्टेकर, योगीराज गाडे, दत्ता कावरे, राजेंद्र भगत आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved