शिवाजी कर्डिले यांनी अहिल्यानगर तालुक्यातून घेतली तब्बल 70 टक्के मते! लंके,पाचपुते यांना मतांची आघाडी, संदेश कार्ले मात्र पिछाडीवर

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व आता अहिल्यानगर जिल्ह्यातील निकालांच्या दृष्टिकोनातून जर आपण मतदारसंघ निहाय व गटनिहाय जर विश्लेषण केले तर काही ठिकाणी अनपेक्षित असे मताधिक्य किंवा आघाडी आपल्याला मिळाल्याचे दिसून येते.

Ajay Patil
Published:
kardile

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व आता अहिल्यानगर जिल्ह्यातील निकालांच्या दृष्टिकोनातून जर आपण मतदारसंघ निहाय व गटनिहाय जर विश्लेषण केले तर काही ठिकाणी अनपेक्षित असे मताधिक्य किंवा आघाडी आपल्याला मिळाल्याचे दिसून येते.

जर तालुक्यानुसार विचार केला तर अहिल्यानगर तालुका जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असल्याने या तालुक्यांमध्ये नेमकी कुणाला किती मतांची आघाडी मिळाली हे देखील या निमित्ताने पाहणे खूप गरजेचे आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील जवळपास 45 गावे ही श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये येतात व त्यासोबतच पारनेर मतदारसंघांमध्ये 42 गावांचा समावेश होतो व त्यासोबत राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तालुक्यातील 25 गावांचा समावेश होतो.

या दृष्टिकोनातून जवळपास श्रीगोंदा मतदार संघ असो की राहुरी मतदार संघ आणि पारनेर विधानसभा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला किती मतांची आघाडी अहिल्यानगर तालुक्यातून मिळाली हे देखील यामध्ये महत्त्वाचे आहे.

शिवाजी कर्डिले यांनी मिळवले 70 टक्के मते
अहिल्यानगर तालुक्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणहून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी एकतर्फी बाजी मारल्याचे दिसून आले व त्यांनी जवळपास या तालुक्यातून 70 टक्के मते मिळवली. तसेच विक्रम पाचपुते यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी अहिल्यानगर तालुक्यातून साडेदहा हजार मतांचा लीड मिळवला.

त्यासोबत राणी लंके यांना 1185 मतांची आघाडी या तालुक्यातून मिळाली. श्रीगोंदा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये नगर तालुक्यातील चिंचोली पाटील व वाळकी या दोन गटांचा समावेश होतो व त्यातील सुमारे 45 गावे या मतदारसंघात येतात.

यामध्ये दोन्ही गटातून महायुतीचे विक्रम पाचपुते यांना 23 हजार 873 मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे यांना 13,275 मते व अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राहुल जगताप यांना 12,339 मते मिळाली.

दुसरे म्हणजे पारनेर मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील 42 गावांचा समावेश होतो. पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी कडून राणी लंके व महायुतीच्या माध्यमातून काशिनाथ दाते यांच्यामध्ये प्रमुख लढत होते.

परंतु अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संदेश कार्ले यांना तालुक्यातून किती मते मिळतील याबाबत देखील एक सगळ्यांमध्ये उत्सुकता होती. परंतु यामध्ये एकंदरीत आकडेवारी बघितली तर संदेश कार्ले मात्र मतांच्या आघाडीत तब्बल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले राणी लंके यांनी सर्वाधिक मतांचे आघाडी मिळवत त्यांना 27 हजार 834 मते मिळाली.

तर विजयी उमेदवार काशिनाथ दाते यांना या तालुक्यातून 26649 मते व संदेश कार्ले यांना 9360 मतांवर समाधान मानावे लागले. या तालुक्यातून राणी लंके यांनी तब्बल 1185 मतांची आघाडी घेतली होती.तसेच अहिल्यानगर तालुक्यातील 25 गावे ही राहुरी मतदार संघात येतात. या ठिकाणी प्रमुख लढत महायुतीचे शिवाजी कर्डिले आणि महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये होती.

जर आपण यामध्ये मतांची आघाडी बघितली तर कर्डिले यांना तब्बल 36 हजार 780 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना 15,719 मते मिळाली.

या ठिकाणहून शिवाजी कर्डिले यांनी जवळपास 21 हजार 61 मतांची आघाडी मिळवली व जवळपास 70 टक्के मतांचे दान नगर तालुक्याने कर्डिले यांच्या झोळीत टाकून कर्डिले यांचा विजय जवळपास निश्चित केला.इतकेच नाहीतर कर्डिले यांना त्यांच्या बुऱ्हानगर या गावातून अडीच हजार मतांची मोठी आघाडी मिळाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe