अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोल्हार येथे नगर-मनमाड महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ शिवशाही बस व एरिटीका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ महिलासह चालक जखमी झाला आहे.
जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगावहुन पुण्याकडे जात असलेली शिवशाही बस कोल्हार येथील प्रवरा नदी पुलाजवळ आली.

शनी शिंगणापूरकडून शिर्डीकडे जात असलेल्या कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचा अंदाज न आल्याने अपघात झाला. या कारमधील ५ महिला गंभीर जखमी असून चालकाच्या डोक्यालाही मार लागला आहे.
अपघातातील कार शिर्डी येथील असल्याचे समजते. सर्व जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जखमींची नावे : अपर्णा अनिल लामा, पार्वती चंद्रप्रकाश लामा, पुनम अनिल लामा, कांची देंढु डुबका, नारीम उदय डुबका (सर्व रा. दार्जिलिंग), निखील संजय अत्रे (रा.राहता)
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™