धक्कादायक : एमआयडीसीत १२ कामगार कोरोना बाधीत !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज सुपे एमआयडीसीत १२ कामगार कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.

एकाच कंपनीमधील कामगारांना बाधा झाल्याची माहिती असून आज तालुक्यातील पाडळी दर्या, म्हसोबा झाप, तिखोल येथे प्रत्येकी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आज दिवसभरात २४ रुग्ण बाधीत, रॅपिड टेस्ट १७, शासकीय लॅब ५ तर खासगी प्रयोगशाळेचे २ अहवाल आले आहेत.

ढवळपुरी, भानगडेवाडी, दैठणेगुंजळ, हिवरेकोरडा, रायतळे, कान्हूर पठार येथील प्रत्येकी एक रुग्ण रॅपिड टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe