गडाख कुटुंबियांच्या जवळ गेल्याने ‘त्या’ सात जणांनी माझा गेम केला…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- एके काळी प्रशांत गडाख यांचा स्वीय सहाय्यक असेलेल्या प्रतिक काळेने आत्महत्येपूर्वी जे पत्र (सुसाईड नोट) लिहून ठेवली आहे,

त्या पत्रामुळे राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या संस्थेतील कर्मचारी व मंत्री गडाख यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

ज्या पोलीस ठाण्याच्या हहीत प्रतिकने आत्महत्या केली. त्या एमआडीसी पोलिसांनी मयत प्रतिकची बहिण कु. प्रतिक्षा बाळासाहेब काळे (वय २३ ह धंदा, शिक्षण, रा.तेलकुडगाव, ता. नेवासा, जि. नगर)

हिने दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला गडाख कुटुंबियांच्या जवळ गेल्याने या सात जणांनी माझा गेम केल्याचे मयत प्रतिकने या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दामोदर देशमुख, राहल जनार्धन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याणराव ओटी, रावसाहेब भिमराज शेळके आणि रितेश बबन टेमक (सर्व रा. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्याविरुध्द प्रतिकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मयत प्रतिक काळेने आत्महत्या करण्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहिली होती, सात जणांविरुध्द खूपच गंभीर आरोप केलेले आहेत. या सुसाईड नोटसह मयत प्रतिकने जो व्हिडिओ आणि ओडियो तयार केला होता, हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

मयत प्रतिकने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात आणि ऑडियोमध्ये मंत्री गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर प्रशांत गडाख आणि पत्नी स्व. गौरी गडाख यांना देवमाणसं म्हटलं आहे.

आज गौरी बहिनी असायला हव्या होत्या मात्र प्रशातभाऊ तुम्ही यांच्यातून बाहेर पडा आणि लवकर बरे व्हा. कारण तुमच्या मुलींना तुमची गरज आहे, अशी भावनिक साद मयत प्रतिकने घातली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe