धक्कादायक : जिल्ह्यातील 14 पोलिसांना कोरोनाने बाधित केले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.

आता एका उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना कोरोनाने बाधित केले आहे. एका सहायक फौजदाराचा कोरोनाने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच बाधित होणार्‍यांची संख्या वाढू लागल्याने

जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या 14 जणांमध्ये 12 पोलीस कर्मचारी शीघ्र कृती दलामध्ये कार्यरत आहेत. उपनिरीक्षक व पोलीस हवालदार शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

अहमदनगरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढतच चालला आहे. या काळामध्ये पोलिस प्रशासन कोरोनायोध्याची भूमिका खूप शानदार पार पाडत आहेत.

परंतु या दरम्यान पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार महिन्यापासून पोलीस दलात कोरोना रूग्ण आढळून आले नव्हते.

परंतू, काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील एका सहाय्यक फौजदाराला कोरोनाची लागण झाली होती. यात या सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला.

शहर पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व दंगल नियंत्रण पथकातील चार पोलीस करोना पॉझिटीव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

त्यातच सोमवारी पुन्हा पोलीस मुख्यालयातील 12 कर्मचारी, शहरातील एका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि हवालदार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त धडकले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment