अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-प्रॉपर्टी व्हॅल्युअरच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी व्हॅल्युअर अभिजीत नाथा घुले (रा. बुरडगाव रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकेश चंद्रकांत कोरडे (रा. नांगरे गल्ली, नगर ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार आरोपीने प्रॉपर्टी व्हॅल्युअरच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून कर्जदार कंपनीच्या संपत्तीचे तब्बल 22 कोटी रूपयांचे व्हॅल्यूशन दाखवून व्हॅल्यूअर व नगर अर्बन बँकेची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
घुले यांचे पत्रकार चौकात कार्यालय असून कोरडे हा सन 2015 पासून त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करत होता. कोरडे याने 27 मार्च 2018 रोजी नेश नीब लॅब टेक्रोरियल,
पुणे या कंपनीसाठी घुले यांचे परस्पर लेटरपॅड, शिक्के वापरून तसेच घुले यांची बनावट स्वाक्षरी करून 22 प्लॉटचे व्हॅल्यूशन 1 कोटी 39 लाख 67 हजार 130 रूपये इतकेच होते.
कर्जासाठी हा दस्ताऐवज नगर अर्बन बँकेच्या पिंपरीचिंचवड शाखेत पाठविण्यात आला. या दस्ताऐवजच्या आधारे कंपनीला जास्त कर्ज दिले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved