धक्कादायक ! पत्नीचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत फेकला

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका नवऱ्याने चक्क आपल्या बायकोच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिचा खून केला.

हा क्रूर व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाही तर व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आपल्या पत्नीचा मृतदेह विहिरीत टाकून दिला. प्रतिभा किरण कासार (वय- 21 रा. वाळकी ता. नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मयत प्रतिभाची आई मंदाबाई अंजाबापू गुंड (वय- 44 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) यांनी फिर्याद दिली असून आरोपी जावई किरण मुरलीधर कासार (रा. वाळकी ता. नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, किरण याने त्याची पत्नी प्रतिभा हिच्या डोक्यामध्ये काहीतरी शस्त्र मारून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने किरण याने प्रतिभाचा मृतदेह घराजवळ असलेल्या विहिरीत टाकून दिला.

घरातील इतरांना प्रतिभा दिसली नसल्याने शोधाशोध केली असतान प्रतिभाचा मृतदेह विहिरीमध्ये मिळून आला. पोलिसांनी किरण कासार विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.