धक्कादायक ! पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाच्या मुलीचे तिच्या मित्रासह तिघांनी अपहरण करुन तिला नगरमधील नेवासा येथे नेत तिच्यावर बलात्कार केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. २१ डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास तरुणी रस्त्याने एकटी जात होती.

त्यावेळी सागर दोन साथीदारांसह गाडीतून तिथे आला. त्याने तरुणीला अडवले आणि मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बस. गाडीत बसली नाही,

तर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, असं म्हणाला. त्यानंतर त्याने विषारी द्रव्याची बाटली तरुणीला दाखवली. त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली.

त्यानंतर तिघांनी तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं व हातपाय बांधून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात घेऊन गेले. तिथेच तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा पुण्यामध्ये आणून सोडलं.

तरुणीने त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणातील असून एकास अटक करण्यात आली आहे. पोलिसाच्याच मुलीवर हा प्रसंग ओढावल्याने सर्वसामान्य नागरीकांची काय स्थिती असेल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment