धक्कादायक ! उसतोडणी पैशांच्या उचली वरून एकाचे अपहरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- सध्या उसतोडणीचा हंगाम सुरु आहे. या काळामध्ये अनेक ठिकाणावरून लोक या कामासाठी येत असतात. परंतु यात बऱ्याचदा पैशांवरून किरकोळ वादही होत असतात.

परंतु हाच वाद जामखेडमध्ये विकोपाला जाऊन याच वादातून एकाचे अपहरण करून घातपात झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

ऊसतोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये ठेकेदाराकडून उचल घेऊन प्रत्यक्षात उचलीप्रमाणे ट्रॅक्टर व ऊसतोडणी मजूर न दिल्याने झालेल्या वादातून जामखेड तालुक्यातील सातेफळ येथिल एका व्यक्तीचे अपहरण काण्यात आले आहे.

गयाबाई आप्पासाहेब भोसले (वय २५ रा. सातेफळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी अजित दिलीप सदाफुले व अर्जुन ( काळू) दिलीप सदाफुले रा. सातेफळ

यांनी अपहरित व्यक्ती बप्पासाहेब मारूती भोसले यांच्या मध्यस्थीने संजय बाजीराव मुंडे रा. अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड यांच्या कडून शरयू साखर कारखाना फलटण जि. सातारा येथे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये उचल घेतली होती.

प्रत्यक्षात उचलीप्रमाणे ट्रॅक्टर व ऊसतोडणी मजूर न दिल्याने दि. ३० आँक्टोबर रोजी गावात वाद झाला व बोलेरो जीप क्रमांक एम एच ४५ ए ८२८३ या जीपने शहादा जि. धुळे येथे जायचे आहे असे सांगून पिडीताचे अपहरण केले आहे व घातपात केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe