धक्कादायक! ‘ह्या’ तालुक्यात ‘रेमडीसीव्हीर’चा तुटवडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दररोज 700 च्या पुढेच रुग्ण संख्या समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

परंतु आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यात कोरोना बाधितांसाठी उपयुक्त ठरणारे ‘रेमडीसीव्हीर’ हे औषध तालुक्यातील एकाही रुग्णालयात व औषधांच्या दुकानात उपलब्ध नाही.

औषध नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड होत आहे. हे औषध आणण्यासाठी बाहेरील तालुक्यांत जावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ व रुग्णांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या कोरोना सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. या औषधाची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्यांना ते घेणे परवडत नाही. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड सेंटर मध्येही हे औषध उपलब्ध नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment