धक्कादायक : दोन दिवसात बिबट्याचे चार ठिकाणी हल्ले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील पूर्व भाग बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून’ दोन दिवसात बिबट्याने चार ठिकाणी हल्ले केले आहेत.

त्यात एक म्हैस ठार तर एका दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेतल्याने तो बिबट्या पासून बालंबाल बचावला तर एका मुलीवर बिबट्याने हल्ला केला.

मात्र गळ्याला ओढणी व स्कार्प असल्याने त्यातून ती मुलगी बालंबाल बचावली. दोन दिवसा पूर्वी पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील शंकर धोंडीबा शिरसाट यांच्या घरासमोर संध्याकाळी बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केल्याने ती म्हैस जागीच ठार झाली.

यात त्यांचे सुमारे लाख रुपयाचे नुकसान झाले. नंतर दस्तगीर शेख यांच्या घरासमोर  बांधलेल्या बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकाच्या प्रसंगावधाने बचावले.

बुधवारी सकाळी अकरा वाजता हरभरा पिकास पाणी देत असताना बिबट्या समोरून येत असल्याचे पाहून दहावीत शिकणाऱ्या नागेश सुदाम महानवर वय सोळा या मुलाने प्रसंग सावधान राखत विहिरीत उडी घेतल्याने तो बिबट्यापासून बालंबाल बचावला.

मात्र विहीरीत ऊडी घेतल्याने त्याच्या पायात दुखापत झाली. आज सकाळी सात वाजता मीडसांगवी येथे सानिया दिलावर शेख हिच्यावर आज सकाळी हल्ला केला, मात्र ती या हल्ल्यातून ती सुदैवानी बचावली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!