अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-अगदी किरकोळ कारणातून दोघा तरुणांमध्ये वाद होऊन एकाने दुसर्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारधार हत्यार पोटात भोकसले होते.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथून संगमनेर तालुक्यातील
धांदरफळ येथे मजुरीसाठी गेलेल्या या मजुराचा खून झाला आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. 11 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता भीमा बाजीराव डोके व अजय मलखान तामचीकर यांच्यात किरकोळ वाद झाले होते.
याचे रुपांतर आणखी तीव्र वादात झाले. याचवेळी तामचीकर याने त्याच्याकडे असणारे धारधार शस्त्र काढून डोके याच्या पोटात खुपसले.
यामध्ये डोके हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तात्काळ उपचारार्थ नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान सोमवारी (ता.14) अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.
तत्पूर्वी हाणामारी झाल्यानंतर दिलीप बाजीराव डोके (मयत तरुणाचा भाऊ) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये