धक्कादायक बातमी : २ दिवसांत नगर शहरात आढळले २५० कोरोनाबाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत ४०३ ने वाढ झाली. जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खासगी प्रयोगशाळेत १५१ पाॅझिटिव्ह आढळले.

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ झाली आहे. नगर शहरात दोन दिवसांत तब्बल २५० रुग्ण आढळून आले. बाधितांचा आकडा १८६४ वर पोहोचला आहे.

महापालिकेकडून नवीन कोरोना केअर सेंटर उभारले जात आहेत, परंतु दोन ते तीन दिवसांतच ही सेंटर्स हाऊसफुल्ल होऊन जातात.

रुग्णांना तेथे दाखल होण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नगर शहरात शनिवारी १३७ रुग्ण आढळून आले होते. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांचा आकडा शंभरीपार गेला.

रविवारी कोरोनाचे ११३ नवे रुग्ण आढळले. शासकीय कोरोणा उपचार केंद्राबरोबरच खासगी केंद्रातही रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment