अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असे म्हटले जाते. येथे येणार निधी, होणारी कामे , चालणारे राजकारण पाहता महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा परिषदेचे नाव आहे.
परंतु बऱ्याचदा खोटे कारनामे देखील येथे होताना पहिले जातात. असाच एक प्रताप जिल्हा परिषद विद्युत विभागात झाला आहे. सोपवलेले काम अपूर्ण असूनही ठेकेदारास 35 लाखांचे बिल अदा करण्यात आले आहे.
त्याचे झाले असे – मागील वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत सोलर युनिट बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 77 पशुवैद्यकीय दवाखान्यांत सोलर युनिट बसविण्यात आले.
मात्र, याठिकाणी स्वतंत्रपणे नेट मीटरसाठी बसविण्यासाठी प्रत्येकी 45 हजार रुपये जादा देऊनही हे नेट मिटर बसविण्यात आले नाही आणि विद्युत विभागाने संबंधित ठेकेदाराला बिल अदा केले आहे.
याबाबत पशुवैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टरांनी पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांच्याकडे तक्रार केली. शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली.
यावेळी हा विषय सभापती गडाख यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशीची करण्याची मागणी सभापती गडाख यांनी केली. तसेच संबंधीत अधिकार्यांवर फौजदारी कराव्याचा ठराव करण्याचा आग्रह गडाख यांनी केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved