धक्कादायक ! ‘ते’कोरोना बाधीत कैदी अद्यापही तुरुंगातच; होऊ शकतो धोका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुका तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे. या तालुक्यातील कारागृहातील 22 कैदी कोरोना बाधीत असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले आहे.

परंतु या कैद्यांकडे आरोग्य व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या कोरोना बाधित कैद्यांना राहुरी कृषी विद्यापीठात हलवण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्यापही हे कैदी संगमनेरच्या तुरुंगातच खितपत पडले आहेत.

महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी जबाबदारीची ढकलाढकली करीत असल्याने कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यातून आरोग्याचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाबाधित झालेल्या या कैद्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी पुन्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.

आरोग्य खात्याने उपाययोजना करण्याची गरज होती मात्र सुरवातीच्या चार दिवसात एकही डॉक्टर कारागृहाकडे फिरकला नसल्याने याचा निषेध नोंदवण्यासाठी या कैद्यांनी जेवणासाठी आलेल्या डब्यांवर बहिष्कार टाकत जेवण नाकारले होते.

त्यानंतर या कोरोनाबाधित सर्व कैद्यांना राहुरीच्या कृषी विद्यापीठात तात्पुरत्या स्वरूपात बनविलेल्या कारागृह तथा कोव्हिड सेंटर मध्ये हलविण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले होते.

मात्र या कैद्यांना अद्यापही राहुरी विद्यापीठात हलविण्यात आले नाही. बॅडमिंटन हॉलमध्ये कैद्यांची व्यवस्था करण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित

यांनी दिली तर या कैद्यांना राहुरी येथे पाठविण्यास कारागृह प्रशासनाने असमर्थता दाखवली यामुळे कैद्यांना राहुरी विद्यापीठात पाठविण्यास वेळ लागत असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment