अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथे एकाने काळविट या हरणाची शिकार केल्याची घटना घडली आहे.
वनविभागाच्या अधिकऱ्यांनी याप्रकरणी पटेल अंकुश पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. याबाबत सविस्तर असे की,
शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथे पटेल अंकुश पवार याने एका काळविटाची शिकार केली व मृत हरिण घरी घेवून आला. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी आरोपीच्या घरी झडती घेतली.
वन विभागाच्या या धडक कारवाईत आरोपीच्या घरात दुचाकी मोटरसायकल, वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेले कुऱ्हाडी, सुरे तसेच जाळे जप्त करण्यात आले.
आरोपी पटेल अंकुश पवार (वय ३५ वर्ष) याने काळवीट या वन्य प्राण्याची शिकार करून त्याला घरी घेऊन आल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे.
या कारवाईत नगरचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहाय्यक वनरक्षक एस आर पाटील, पाथर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत वनरक्षक आप्पा घनवट,स्वाती ढोले, नौशाद पठाण,वनसेवक विष्णु सोले हे सहभागी झाले होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved