धक्कादायक! रात्रीच्या वेळी ‘त्या’ दुचाकीस्वाराबाबत ‘झाले’ असे काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रात्रीच्या वेळी बोधेगाव येथून तिसगावला दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला चोरट्यांनी भरस्त्यात अडवून लुटून नेले. ढवळेवाडी फाट्याजवळ शनिवारी हा प्रकार घडला.

भारत रामकिसन मरकड असे या व्यक्तिचे नाव आहे. चोरटयांनी त्या व्यक्तीकडील पैसे व त्याची दुचाकी चोरून नेली. दोन दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी मरकड यांचा पाठलाग केला.

त्यानंतर धावत्या दुचाकीवरूनच एका चोरट्याने मरकड यांच्या दुचाकीला जोराची लाथ मारली. त्यामुळे मरकड हे दुचाकीवरून खाली पडले.

त्यानंतर चोरट्यांनी मरकड यांच्याजवळ येत त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली, तसेच त्यांची मोटरसायकल बळजबरीने हिसकावून घेत चोरटे निघून गेले. या प्रकाराबाबत मरकड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment