अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- रात्रीच्या वेळी शेवगाव तालुक्यातील अंतरवाली शिवारात एका दुचाकीस्वाराला आणि पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी परिसरात एका दुचाकी चालकाला भरस्त्यात अडवून लुटून नेले.
अनिल दिगंबर पवळे असे या व्यक्तीचे नाव आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात व पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
अनिल दिगंबर पवळे हे मंगळवारी, २९ सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील अंतरवाली शिवार येथील रस्त्यावरून दुचाकीवर जात होते.
यावेळी एका अज्ञात व्यक्तीने पवळे यांची दुचाकी अडवली व त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच पवळे यांच्याकडील २७ हजार रुपये रोख, मोबाइल, पॅन कार्ड, एटीएम कार्ड,
आधार कार्ड घेतले आणि पवळे यांची दुचाकी घेऊन चोरट्याने तेथून पळ काढला. दुसऱ्या घटनेत पाथर्डी येथील माजलगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरून अंकुश विनायक तौरे हे दुचाकीवरून चालले होते.
फुंदे टाकळी शिवारात येताच तौरे यांचा दुचाकीच्या पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या. या तिघांनी तौरे यांची दुचाकी अडवली व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
करून त्यांच्याकडील सहा हजार रुपये, दोन मोबाइल व त्यांची दुचाकी घेऊन तिथून पळ काढला. दोन्ही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved