अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- नेवासे तालुक्यातील नेवासाफाटा येथे फरार आरोपी व त्याच्या भावाने पोलिसांना शिवीगाळ व यांच्याशी झटापट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉन्स्टेबल वसीम मुस्तफा ईनामदार यांनी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले की, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जनता कर्फ्यू असल्याने आम्ही पेट्रोलिंग करत होतो. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी हवालदार ठोंबरे व मला बोलावून कळविले की, नेवासाफाटा येथील राहुल रेस्टॉरंट समोर बादल कैलास परदेशी व त्याचे काही साथीदार भांडणे करत आहेत.
तसेच तो दारुच्या गुन्ह्यात फरार असल्याने आम्ही व उपनिरीक्षक दाते, उपनिरीक्षक वाघ पोलीस नाईक गायकवाड, पवार, होमगार्ड मनोज देवखिळे असे त्याच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला. उपनिरीक्षक दाते यांनी त्यास तुम्ही राहुल रेस्टॉरंटसमोर वाद घातले का? तसेच तुला दारुच्या गुन्ह्यात अटक करायची आहे.
त्यामुळे तू आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चल असे सांगितले असता त्याने पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला. त्यावेळी तेथे जवळच उभा असलेला त्याचा भाऊ सुरज कैलास परदेशी यांनी दोघांनी माझ्या अंगावर धावून येऊन आम्ही करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून धाकाने परावृत्त केले व आम्हास शिवीगाळ केली.
तुम्ही खूप माजलेत असे म्हणून झटापट केली. यावरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 353, 332, 294, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved